विश्वशांती महोत्सवाला सुरुवात

March 11, 2016 10:39 PM0 commentsViews:

11 मार्च : श्री श्री रविशंकर यांचा विश्वशांती सांस्कृतिक सोहळ्याची दिल्लीत आजपासून धडाक्यात सुरुवात झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याचं उद्घाटन केलं. उद्घाटनाच्या दिवशीच दिल्लीत पावसानं हजेरी लावली. पण त्याचा लोकांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याबद्दल श्री श्रींचं कौतुक केलं. या सोहळ्याच्या उद्घाटनाबद्दल शेवटपर्यंत गूढ होतं. राष्ट्रीय हरित लवादानं 5 कोटींचा दंड ठोठावला होता. पण आर्ट ऑफ लिव्हिंगनं 25 लाख रुपये भरले. पुढच्या तीन आठवड्यांत राहिलेले 4 कोटी 75 लाख रुपये भरण्याचे आदेश लवादानं दिलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close