बुलडाण्यात पतीचा पत्नी आणि मुलीवर कुर्‍हाडीने हल्ला, तिघांचा मृत्यू

March 12, 2016 2:02 PM0 commentsViews:

kolhapur crimeबुलडाणा – 12 मार्च : शहरातील मेहकर तालुक्यात वडिलांनीच घरातल्या चार जणांवर कुर्‍हाडीनं हल्ला केलाय. या हल्ल्यात पत्नी आणि दोन मुलींचा मुलीचा जीव गेलाय. हल्ला करून समाधान अंभोरे फरार झाला होता पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

कासारखेड गावात घरगुती वादातून शुक्रवारी रात्री 2 च्या सुमाराला हा प्रकार घडलाय. यामध्ये अश्विनी अंभोरे आणि अंकिताची या मुलीचा जीव गेलाय. तर पत्नी मीना आणि एक मुलगा गंभीर जखमी झालीये. सध्या जखमींना उपचारार्थ औरंगाबाद रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पण, उपचारादरम्यान, पत्नी मीना अंभोरेचा मृत्यू झालाय. तर मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी समाधान अंभोरेला अटक करण्यात आलीये. त्याने हा हल्ला का केला याची चौकशी सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close