पीएचडी काळाबाजार : गीता पाटीलच्या पाठिशी राष्ट्रवादीचा आमदार ?, विद्यापीठाकडून कारवाईस टाळाटाळ

March 12, 2016 2:16 PM0 commentsViews:

phd3औरंगाबाद – 12 मार्च : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातला पीएचडी काळाबाजार आम्ही उघडकीला आणताच पैसे मागणार्‍या प्राध्यापिका रेणुका भावसार बडवणे यांची गाईडशीप रद्द करण्यात आली आहे. पण याच प्रकरणातल्या दुसर्‍या प्राध्यापिका डॉ.गीता पाटील यांच्यावर कारवाई करायला विद्यापीठ प्रशासन अजूनही टाळाटाळ करतंय.

गीता पाटील यांची पीएचडी करणार्‍या विद्यार्थिनीला चक्क चेक मागितला होता. आणि जोपर्यंत वटत नाही तोपर्यंत तुझा थिसेसवर सही करणार नाही असा हट्ट धरला होता. पण, या गीता पाटीलवर अजूनही कारवाई करण्यात आलीये. त्यांची गाईडशीप अजूनही रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे पीएचडीसाठी विद्यार्थ्यांना पैसे मागणार्‍या प्राध्यापिका गीता पाटील यांना नेमकं कोण वाचवतंय. असा सवाल उपस्थित होतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हेच प्राध्यापक गीता पाटील यांना पाठिशी घालत असल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणावर कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी ही मुंगगिळून गप्प राहण्याची भूमिका घेतलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close