पाठलाग करून टीसीने महिला प्रवाशाला केली मारहाण

March 12, 2016 2:56 PM0 commentsViews:

mahila_tc3नवी मुंबई – 12 मार्च : खारघर रेल्वे स्टेशनवर एका टीसीने एका महिला प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर पकडून मारहाण केल्याची घटना घडलीये. पाठलाग करून मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. अश्विनी पी असं या महिला टीसीचं नाव आहे.

ही घटना 22 फेब्रुवारी सकाळी साडेनऊच्या सुमाराची आहे. जेव्हा एक तरुणीला टीसी अश्विनी पी यांनी तिकीट विचारलं.
पण तिच्याकडे तिकीट नव्हतं.. त्यामुळे ती तरुणी घाबरून तिथून पळायला लागली. या नंतर या महिला टीसीने तिचा पाठलाग केला आणि तिला पकडलं. या नंतर तिच्या केसाला धरून ओढत नेलं. या प्रकरणी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाहीये, ज्या महिला टीसीने महिला प्रवाशाला मारहाण केली. टीसी अश्विनी पी या मध्य रेल्वेच्या तेज स्पेशल-1 बॅचमध्ये कार्यरत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close