शेतकामांच्या नियोजनाचा दिवस

March 16, 2010 11:05 AM0 commentsViews: 2

माधव सावरगावे, औरंगाबाद15 मार्चगुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन वर्ष हे शेतीच्या हंगामाशी जोडले गेलेले आहे. चैत्र हा या नवीन वर्षाचा पहिला महिना. या दिवशी महाराष्ट्रातील बळीराजा एक खास आणि वेगळी परंपरा जपतो. ती म्हणजे, त्याच्या वर्षभराच्या कामाचे नियोजन तो आज करतो. या दिवशी गुढी उभारल्यानंतर थेट शेतात जाऊन वर्षभराच्या कामाचे नियोजन होते. सालाने काम करणार्‍या सालगड्यासोबत चर्चा केली जाते. आणि त्यानंतर पूजा करुन शेतीच्या कामांचा शुभारंभ होतो.शेतक-यांना वर्षभरात अनेक अडचणी येतात. कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी बाजार. मात्र सालगड्याचा पगार, त्याचा आहेर शेतकरी कधी विसरत नाही..आणि हे सालगडीही आपल्या धन्याला तेवढ्याच विश्वासाने साथ देतात.सारे हिशेब पाडव्यापूर्वी संपतात. नव्या हंगामाच्या कामालाही हळूहळू वेग येतो… आणि आपली परंपरा जपत बळीराजा पुन्हा काळ्या मातीत खपू लागतो…

close