‘शिवाजी अंडरग्राऊंड’ नाटकाचा टेम्पोला अपघात, 1 जण ठार

March 12, 2016 4:10 PM0 commentsViews:

बीड -12 मार्च : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या कर्मचार्‍यांच्या टेम्पोला अपघात झालाय. या अपघातात कलाकार आनंद मोघे यांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहे.beed_Accident3

नांदेडमध्ये नाटकाचा प्रयोग आटोपून काही कलाकार रेल्वेने निघाले होते तर साहित्य घेऊन नांदेडहुन टेम्पो निघाला होता. प्रवासादरम्यान पहाटेच्या सुमारास गेवराई -माजलगाव रस्त्यावर कालव्यात टेम्पो कोसळला. या अपघातात आनंद मोघे यांचा मृत्यू झाला. तर टेम्पोचालकासह दोघेजण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close