गांधींचा वध कसा म्हणता येईल ? -शरद पवार

March 12, 2016 5:56 PM0 commentsViews:

pawar_on_bjp_newsनाशिक – 12 मार्च : वध हा कंसाचा असतो,राक्षसाचा असतो पण गांधींचा वध कसा म्हणता येईल ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. गांधीवध या शब्दास माझा आक्षेप आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. यशवंतराव चव्हाण विद्यापीठात “यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र” या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजनकरण्यात आलंय. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते.

खरं तर अत्यंत शांतपणे,मुद्देसूद आणि अभ्यासु वक्तव्य करणारा नेता म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. पण पवार नेमकं बोलतात काय, त्याचा अर्थ काही भलताच निघता ेआणि घडतं काही वेगळंच…असं नेहमीच होतं.

या चर्चासत्रात विषय नसताना गांधीवध या विषयावर त्यांनी बोलायला सुरूवात केली आणि पाहता पाहता गांधींचा वध केला हा विचार समाजात प्रचलित करणार्‍याच्या मानसिकतेवर पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

वध हा कंसाचा असतो, राक्षसाचा असतो पण गांधींचा वध कसा म्हणता येईल ?, ज्यांनी गांधींची हत्या केली त्यांच्या मनात गांधींबद्दल काय विचार होता. तो या शब्दातून त्यांनी समाजात पसरवला गेला. त्यामुळे बोलता बोलता गांधीवध सहज हा शब्द वापरला जातोय या शब्दावर माझा आक्षेप आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. आता हा मुद्दा उपस्थित करुन पवारांना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे ? हा प्रश्न उपस्थित झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close