‘देव तारी…’ लोकलचे तीन डबे अंगावरून गेले तरी ‘तो’ सुखरूप

March 12, 2016 8:40 PM0 commentsViews:

मुंबई -12 मार्च : ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे.ती तंतोतत खरी ठरलीय ती राजेंद्र सिंग यांच्याबाबत.. मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावर गुरुवारी घडलेला हा थरार पाहायला मिळला. ट्रेनचे तीन डबे अंगावरून गेले तरी राजेंद्र सिंग नावाचा व्यक्ती सुखरूप बचावला.local4223

सीएसटी रेलवे स्टेशन च्या प्लेटफॉर्म क्रमांक 3 वर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक इसम ट्रॅकवर पड़ला ट्रेन त्याच्या वरुन गेली पण त्याला काहीच झालं नाही. 50 वर्षांच्या त्या व्यक्तिचं नाव राजेंद्र सिंग आहे. त्याला काढण्यासाठी जेव्हा लोक प्रयत्न करत होते तेव्हा हा घाबरून बाहेर निघतच नव्हता.बाहेर काढण्यासाठी 25 मिनिट ड्रामा चालला. या नंतर त्यांना काढण्यात यश आलाय. याप्रकरणी आरपीएफने त्यांना रुळ ओलांडलं म्हणून अटक केलं आणि कोर्टात हजर केलं असता कोर्टाने जामिनावर सोडून दिलं. राजेंद्र जेव्हा रुळ ओलांडताना रुळावर पड़ला तेव्हा मोटरमॅनने ब्रेक लावला पण ट्रेन थांबेपर्यंत राजेद्रच्या अंगावरून 3 डब्बे निघाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close