होमवर्क केला नाही म्हणून विद्यार्थ्यांना अर्धनग्न उभं केलं क्लास बाहेर

March 12, 2016 9:35 PM0 commentsViews:

मुंबई – 12 मार्च : होमवर्क पूर्ण केला नाही म्हणून क्लासेसच्या शिक्षकांनी मुलांना अर्धनग्न करून क्लासेसच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना मालवणीमध्ये घडलीये.malvani3

मालवणीमधील श्री कोचिंग क्लासेसच्या बाहेर शिक्षा म्हणून काही मुलांना कपडे काढून उभं केलं. या क्रुर शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या मुलांनी होमवर्क केला नाही म्हणून त्यांना क्लासेसच्या शिक्षकांनी शिक्षा दिली होती. आता या प्रकरणात ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गणेश नायर, सरोज जैसवाल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close