योगगुरू बाबा रामदेवही आता राजकारणात

March 16, 2010 11:32 AM0 commentsViews: 1

16 मार्च भारतीय राजकीय व्यवस्थेच्या शुध्दीकरणासाठी बाबा रामदेव यांनी आता पुढाकार घेतला आहे. भारत स्वाभिमान संघटनेतर्फे पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा रामदेव बाबा यांनी केली आहे. या संघटनेत आपण कोणतेही पद स्वीकारणार नाही किंवा निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेत 7 ते 8 लाख सदस्य तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले. मायावती यांना टोला हाणताना देशाची संपत्ती गरीब आणि दलित लोकांसाठी वापरली पाहीजे. नोटांचे हार बनवण्यासाठी नाही, असेही ते म्हणाले.

close