मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल टँकरला आग; वाहतूक विस्कळीत

March 13, 2016 12:21 PM0 commentsViews:

Accident234

मुंबई – 13 मार्च : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीवळील मेंढवनजवळ टँकरला भीषण आग लागली. टँकरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला आणि त्यानंतर टँकरने पेट घेतला.

दरम्यान, या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. आज सकाळी 8.30 वाजण्याच्या ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर अहमदाबादकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली. सध्या या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीन सुरू करण्यात आलीये.

घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close