राज ठाकरेंना धमकावणार्‍या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला

March 13, 2016 1:46 PM1 commentViews:

dindoshi587

मुंबई – 13 मार्च : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत. उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करू, असं खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरे यांना धमकी दिली होती.

तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असेही या पत्रात कंबोज यांनी म्हटलं होतं. तसेच, हे पत्रक त्यांनी सोशल मिडियावरही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनीच हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर, जाळून टाका असा आदेश दिला होता. नव्या देत असलेल्या रिक्षा परवान्यांमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकांचा भरणा अधिक असल्याचा त्यांनी आरोप केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Yashdeep Joshi

  मुंबईच्या लोकसंख्येचा आढावा घेतला , तर मुंबईत साधारण ४० लाख मराठी लोक राहतात तर उर्वरित बृहन्महाराष्ट्रात ७.५ कोटी मराठी लोक राहतात.

  मनसेच्या जाळपोळ-तोडफोड-हाणामारीच्या आंदोलनांनी मुंबईच्या मराठी लोकांचा किती फायदा होतो, हे माहित नाही, मात्र उर्वरित महाराष्ट्रातील ७.५ कोटी मराठी लोकांची आणि महाराष्ट्राबाहेरील १ कोटी मराठी लोकांचे बेसुमार नुकसान आणि बदनामी होत आहे. उर्वरित महाराष्ट्रातील लोकांचे परराज्यातील व्यावसायिक संबंधसुद्धा यामुळे तुटत आहेत .

  मुंबईत १९४० पासून “मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही” हि रडारड का चालू आहे, हेच समजत नाही.

  कारण पुण्यात मागील ७० वर्षांत एकदाही अशी रडारड – तोडफोड – जाळपोळ झालेली नाही. मी पुण्यात गेल्या २८ वर्षांत कधीही मराठी म्हणून असुरक्षितपणाचा अनुभव घेतला नाही. किंबहुना सातवाहनांच्या काळापासून अनेक परकीय आक्रमण होऊनही पश्चिम महाराष्ट्राचा मराठीपणा नष्ट झाला नाही, तो मूठभर बिहारी लोकांनी नष्ट होणार नाही, हे निश्चित .

  दुसरीकडे मुंबईत दर सहा महिन्यांनी यांची हि नाटकं चालू आहेत, कधी जैन लोकांच्या दुकानावर अंडी फेकून मारणे, कधी परप्रांतीयांच्या रिक्षा-दुकाने फोडणे, कधी भैया लोकांना मारहाण करणे, यातून साध्य काहीच होत नाही, उर्वरित महाराष्ट्राच्या ७.५ कोटी मराठी लोकांची बदनामी मात्र होते.

  मला हा प्रश्न समस्त मुंबईच्या लोकांना विचारायचा आहे कि – “४० लाख मुंबईकर मराठी लोकांसाठी उर्वरित बृहन्म्हाराष्ट्राच्या ७.५. कोटी मराठी लोकांना का वेठीला धरता???”

  “**एका बाजूला मुंबईच्या तिजोरीतील पैसा भ्रष्ट सरकारी कर्मचा-यांच्या लोभी कारभारामुळे दूरवर विदर्भात पोचतच नाही, म्हणून आता विदर्भात स्वतंत्र होण्याची मागणी तीव्र स्वरूप धरत आहे.”

  विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळ-आत्महत्या हे critical विषय सोडून असले मारहाण-जाळपोळीचे उद्योग मनसेकडून होत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे.

close