गुलाम नबी आझादांकडून RSSची ISISशी तुलना; संघाकडून माफीची मागणी

March 13, 2016 5:10 PM0 commentsViews:

नवी दिल्ली – 13 मार्च : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची तुलना आयसीसशी केली आहे. हिंदुराष्ट्र स्थापनेचे ध्येय बाळगणारा संघ आणि इस्लामी जगाची मागणी करणारी दहशतवादी संघटना आयसीस या दोघांचे सिद्धांत सारखेच असून आम्ही दोघांचाही विरोध करतो, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

‡Ô‹‹ ôû†Öê‹Æü¸êü

काल जमीयत उलेमा-ए-हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता संमेलनात ते बोलत होते. दरम्यान, या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे.

भाजप आणि संघाने आझाद यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे. आझादांचं वक्तव्य त्यांचं अज्ञान दिसून येतं, अशी टीका संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केली आहे. तर लोकसभा निवडणुकीतला पराभव काँग्रेसला अजूनही पचलेला नसून या वक्तव्याबद्दल आझाद यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close