नोटांच्या हारामुळे मायावती वादात

March 16, 2010 11:44 AM0 commentsViews:

16 मार्च उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची महारॅली वादात सापडली आहे. या रॅलीसाठी 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत.कालच्या रॅलीत मायावतींना भलामोठा एक हजारांच्या नोटांचा हार घालण्यात आला. हा हार 2 ते 5 कोटी रुपयांच्या असावा असा अंदाज आहे. तर हा हार यापेक्षा कमी किमतीचाअसल्याचा दावा बसपाने केला आहे.मायावतींना मात्र वेगळीच काळजी आहे. आपल्या भाषणाच्या वेळी अचानक मधमाशा कशा आल्या, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

close