महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणं चुकच; संघाची भूमिका

March 13, 2016 8:52 PM0 commentsViews:

328_08_16_42_RSS-Sarkarwah-Shri-Sureshji-Joshi-1_H@@IGHT_463_W@@IDTH_700

राजस्थान – 13 मार्च : महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणं चुकच असून असं करणार्‍यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलं आहे.

त्र्यंबकेश्वर आणि शनिशिंगणापूर या ठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी भुमाता ब्रिगेडने आंदोलन छेडलं आहे, या पार्श्वभुमीवर जोशी यांनी राजस्थानमध्ये आपलं मत व्यक्त केलं आहे. काही परंपरा या चुकीच्या आहेत त्या बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. बदल हे चर्चेतुन घडावेत आंदोलनांद्वारे नव्हे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close