दारू धोरणाच्या निषेधासाठी ‘वर्षा’वर मोर्चा

March 16, 2010 12:48 PM0 commentsViews: 2

15 मार्चअन्नधान्यापासून दारू निर्मितीच्या सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर धडकले. त्यांनी मुख्यमंत्र्याना दारुची बाटली भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. अन्नधान्यापासून दारूनिर्मिती धोरण विरोधी मंचाने हे आंदोलन केले. अमोल मडामे आणि वर्षा विवि यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले. राज्यातील लाखो गरिबांना अजूनही पुरेसे धान्य मिळत नाही. त्यांना पहिल्यांदा पुरेसे अन्नधान्य पुरवावे, महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र बनवू नये, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

close