विधानसभेमध्ये दुष्काळावरच्या चर्चेला आज मुख्यमंत्री देणार उत्तर

March 14, 2016 8:42 AM0 commentsViews:

cm_on_st_workersमुंबई – 14 मार्च : विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज सुरू होतोय. पहिल्या आठवड्यात दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी विधानसभा आणि विधान परिषदेत दुष्काळावर चर्चाही झाली. आज (सोमवारी) त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत.

राज्यात पडलेला दुष्काळ आणि सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर विरोधकांनी सडकून टीका केलीये. शेतकर्‍यांना कर्ज माफी, वीज बिल माफ आणि विद्यार्थ्यांची फी माफी अशी प्रमुख मागणी विरोधकांनी केलीये. मागील आठवड्यात दुष्काळाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी कामानिमित्त सभागृह काही वेळासाठी सोडले होते. त्यामुळे आम्ही इथं काय गोट्या खेळण्यासाठी येतो का ? सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही अशी टीका अजित पवार यांनी केली होती. यावरुन अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या उत्तराला विरोधक कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close