छगन भुजबळ ईडीच्या आॅफिसमध्ये पोहचले, चाैकशी सुरू

March 14, 2016 11:54 AM0 commentsViews:

67bhujbal14 मार्च : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहे. तसं समन्स ईडीनं त्यांना बजावलं होतं. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी हे छगन भुजबळ यांना हे समन्स बजावण्यात आलं . मनी लाँडरिंग प्रतिंबध कायदा आणि फेमा या दोन कायद्याअंतर्गत भुजबळ यांची चौकशी करण्यासाठी त्यांना हजर रहायला सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, भुजबळ ईडीच्या आॅफिसमध्ये हजर झाले आहे.

याआधी छगन भुजबळ यांची एसीबीनंही चौकशी केली आहे, त्यानुसार आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी भुजबळ यांचे आमदार पुत्र पंकज यांची ईडीनं चौकशी केली होती. ईडीने पंकज यांची गेल्या महिन्यात याच प्रकरणात पंकज यांची चौकशी केली होती. तर माजी खासदार समीर भुजबळ यांची न्यायालयीन कोठडीदेखील आजच संपत आहे.

ईडीने या प्रकरणी भुजबळ कुटुंबियांच्या नऊ मालमत्तांवर छापे टाकले आहेत. ईडीच्या तपासात 875 कोटी रुपयांची बेकायदेशीर रक्कम दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात समीर भुजबळ हे मात्र दोनशे कोटींचाच हिशेब देत असल्याने त्यांच्या कोठडीत मुदतवाढ झाली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या चौकशीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. भुजबळांच्या गोटात मात्र घबराट पसरलेली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close