हॅपी बर्थ डे आमिर, त्याच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टीही जाणून घ्या !

March 14, 2016 12:17 PM0 commentsViews:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज वाढदिवस आहे. गेली 26 वर्षं आमिरने बॉलिवूडमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. आमिर वर्षातून एखादा सिनेमा करतो पण त्याचा एक सिनेमा हा अनेक सिनेमांची बरोबर करतो. त्यामुळे त्याचे चाहते त्याची आतुरतेनं वाट पाहता. पण, अलीकडे असहिष्णुतेच्या मुद्यावर जाहीर भाष्य करून भाजपकरांची नाराजी ओढावून घेतलीय. त्याच्यावर नव्हे ते इतकी चर्चा झाली.

परंतु, आपल्या विधानमुळेच नाहीतर खाजगी आयुष्यात ही आमिर नेहमी चर्चेत राहिला. आमिरने आपल्या करिअरला बालकलाकार म्हणून सुरूवात केली. 11 व्या वर्षी ‘यादों की बारत’ या सिनेमात आमिरने काम केलं होतं. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाने आमिरला खरी ओळख मिळवून दिली. वयाच्या 21 व्या वर्षी आमिरने रिना दत्ता यांच्याशी विवाह केला. त्यांना जुनैद आणि इरा ही दोन मुलंही आहे. त्यानंतर 2002 मध्ये रिना दत्ता यांच्याशी घटस्फोट घेऊन आमिरने किरण रावसोबत लग्न केलं. त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे.

आमिरने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले त्यामध्ये ‘जो जिता सिकंदर’, ‘दिल’, ‘अंदाज अपना अपना’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘लगान’, ‘रंग दे बंसती’, ‘गजनी’, ‘धूम-3′, सिनेमांचा समावेश आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आमिरने ऍवॉर्ड सोहळ्यावर बहिष्कार घातला. अजूनही आमिर कोणत्याही ऍवॉर्ड सोहळ्याला जात आहे. अलीकडे असहिष्णुतेच्या मुद्यावर भाष्य केल्यामुळे आमिर अडचणीत सापडला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close