‘बागवेंनी राजीनामा द्यावा’

March 16, 2010 12:59 PM0 commentsViews:

15 मार्चगृहराज्यमंत्री बागवे यांना पोलिसांनी जर अपमानास्पद वागणूक दिली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. बागवे यांना स्वतःच्या सुरक्षेची जास्त काळजी आहे, पुणेकरांची नाही, असा टोलाही गोर्‍हे यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांचे जोडे उचलून आपल्या कृतीचे समर्थन करणार्‍या बागवे यांना खरेच अपमान वाटला असेल, तर त्यांनी सी. डी. देशमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे राजीनामा द्यावा, असे आवाहनही गोर्‍हे यांनी केले आहे. यातून बागवे फक्त स्वत:चा बडेजाव वाढवत आहेत, तसेच पुणे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करत आहेत, असेही गोर्‍हे म्हणाल्या.

close