जव्हारचे ‘एबीसीडी’ स्टारर्स, डान्स असा की नुसता नाद खुळा !

March 14, 2016 1:17 PM0 commentsViews:

विजय राऊत, जव्हार – 14 मार्च : आपल्याला महाभारतातील एकलव्य सगळ्यांनाच आठवतो…हाच तो एकलव्य आहे ज्याने गुरुविना धर्नुविद्येत निपुणता मिळवली…आता आपण बघणार आहोत आधुनिक युगातले एक नाही अनेक एकलव्य…हे सगळे एकलव्य जव्हार या आदिवासी भागातले आहेत…ज्यांनी कोणीही प्रशिक्षक नसतांना बी-बोईंग डान्स प्रकारात हुकुमत मिळवली आहे…जव्हारच्या च्या ‘एबीसीडी’ गँगचा हा रिपोर्ट…

javhar_dance

लाईट…कॅमेरा…ऍक्शन…नाचो….डोक्यावर रखरखतं ऊन….तरीही बॅलन्स न जाऊ देता जव्हारच्या या एकलव्यांचा बी बोईंग डान्स थक्क करणारा आहे…बरं आता तुम्ही विचाराल हे कसं शक्य झालं…त्यासाठी थोडं मागे जाऊया…

किशोर आणि अक्षय या गावातली मुलं… शाळा शिकत असतांनाच वडापावची गाडी चालवण्याचं काम करतात. पोट भरण्याची भ्रांत
असली तरी या दोघांमध्ये एक उत्कृष्ट डान्सर आहे. त्यांच्या या हौसेला जोड मिळाली ती या गावातील आयडीसी डान्स ग्रुपची…हा ग्रुपही गावातील आदिवासी मुलांनी एकत्र येऊन स्थापन केला आहे. किशोरच्याच या गाड्यावर ही सगळी मुलं जमतात. यावेळी चर्चेचा एक विषय असतो तो म्हणजे डान्स… jawahar_dance_grp (8)

परिस्थिती माणसाला घडवते किशोर, अक्षय आणि त्यांचे मित्र आपल्याला घडतांना दिसताहेत. जो आदिवासी आपल्याला तारपावर
डोलतांना दिसतो. त्याच आदिवासी समाजातली मुलं बी-बोईंग डान्सवरती आपली हुकुमत असल्याचं दाखवून देत आहेत.

ज्या प्रकारे ही मुलं डान्स करताहेत त्यावरुन असंच वाटेल यांना कोणीतरी शिकवणारं असेल. पण तसंही काही नाही..आमचे गुरू आम्हीच आहोत या भावनेतून भर उन्हातली ही तालीम रोज न चुकता रंगते…हे बघतांना “वाह क्या बात है..”अस म्हंटल्याशिवाय राहवत नाही. पण हे बघतांना मनात एक प्रश्न कायम असतो की ही मुलं हा डान्स बसवतात तरी कसा?

यात आणखी एक विशेष म्हणजे तुम्ही या मैदानावरची तालिम पाहिली तर असं लक्षात येईल की, कोणतीही म्युझिक सिस्टीम या मुलांकडे नाहीए…आहे एक मोबाईल..त्यात वाजणार्‍या गाण्यावर ही तालीम चालते..या बी-बोईंग डान्समधली प्रत्येक स्टेप काळजाचा ठोका चुकवणारी आहे. बॅलन्स थोडा इकडचा तिकडे झाला तर मोठी इजाही होऊ शकते. पण त्याचीही चिंता नाहिए कारण मनात डान्स
शिकण्याचा जुनुन आहे.jawahar_dance_grp (2)

हा बी- बोईंग डान्स या आयडीसी ग्रुपने आत्तापर्यंत आजुबाजुच्या गावांमधील वेगवेगळ्या डान्स स्पर्धेत सादर केलाय. या स्पर्धेतही या
मुलांनी पहिल्या क्रमांक मिळवण्यात बाजी मारली आहे. पण यातून मिळणार्‍या बक्षीसाचं काय करता असं या मुलांना विचारला असता,
“आम्हाला ज्या जखमा होतात त्यावर इलाज करतो..नवीन टिशर्ट बनवतो” असं उत्तर या मुलांनी दिलं.

तो दोस्तो अर्ज किया है, “कौन केहता है आसमा में छेद नही होता..बस तबियत से पत्थर उछालो तो…”हेच या जव्हारच्या एकलव्यांनी करुन दाखवलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close