‘ते’ समुद्रात 51 किमी पोहले

March 14, 2016 1:26 PM0 commentsViews:

14 मार्च : भारतात पहिल्यांदा आगळावेगळा असा साखळी पद्धत्तीने पोहण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. धरमतर ते बेलापूर रेतीबंदरचं अंतर दोघा विद्यार्थ्यांनी साखळी पद्धत्तीने पार केलं. महाराष्ट्र जलतरण संघटना आणि ओपन वॉटर सी ट्रेनिंग असोसिएशनच्या माध्यमातून चौथीत शिकणार्‍या वेदांत सावंत आणि पाचवीत शिकणार्‍या राजू पाटील यांनी हे शक्य करुन दाखवलंय. या दोघांनी साखळी पद्धत्तीने 10 तास 45 मिनीटं पोहुन विक्रम केला आहे. हे 51 किमीचं अतंर पार करणारे ते पहिले भारतीय ठरलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close