भाजप-सेनेत पुन्हा संघर्ष

March 16, 2010 1:36 PM0 commentsViews:

15 मार्चशिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. यावेळचा संघर्ष आहे, तो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळावे यावरून. या मुद्द्यावरूनच युतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. हे पद शिवसेनेलाच मिळावे, अशी आग्रही भूमिका सेना नेत्यांनी घेतली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, यांनी विधानपरिषद सभापतींना एक पत्र लिहिले आहे. सभागृहात भाजपपेक्षा शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याचे रावते यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शिवसेनेला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजप मात्र आपल्याकडचे हे पद सोडायला तयार नाही. अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र हा दावा शिवसेनेला मान्य नाही, याचे पडसाद गुरुवारपासून सुरु होणार्‍या विधीमंडळ अधिवेशनात उमटू शकतात.

close