‘भारत माता की जय’ म्हणायला ओवैसींचा नकार

March 14, 2016 9:29 PM0 commentsViews:

लातूर -14 मार्च : वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत राहणारे एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. लातूर इथल्या एका सभेत बोलताना ओवैसी यांनी भारत माता की जय म्हणायला नकार दिला आहे.

Owaisis

काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले होते की देशातील लोकांना भारत माता की जय बोलणे शिकविले जाते. भागवतांच्या या वक्तव्याचा उल्लेख करून असदुद्दीन ओवैसी यांनी वरील वक्तव्य केले. ओवैसी यांचे हा खळबळजनक वक्तव्य समोर आल्यानंतर या मुद्दयावर राजकारण सुरू झाले आहे.

त्याच्या विरोधात बोलताना, मी जरी भारतात राहत असलो, तरी भारत माता की जय असं म्हणणार नाही. कारण घटनेत किंवा कुठल्याही कायद्यामध्ये भारत माता की जय अशी घोषणा लिहिली नाही. त्यामुळं अशी घोषणा मी करणार नाही असा युक्तीवाद ओवैसी यांनी केला आहे.

आपल्या गळ्यावर कुणी चाकू जरी लावला तरी, भारतमाता की जय असं कधीच बोलणार नाही, असंही ओवैसींनी म्हटलं आहे. त्यामुळं काही लोक म्हणतात म्हणून ही घोषणा देणार नाही असंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close