राज्यात औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी – बापट

March 14, 2016 6:17 PM0 commentsViews:

Girish Bapat213

मुंबई – 14 मार्च : राज्यात औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी असल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी दिली आहे. ऑनलाईन औषध विक्री करण्यासंबधी लक्षवेधी सूचना आज (सोमवारी) विधान परिषदेत देण्यात आली.

राज्य सरकारने ऑनलाईन औषध विक्रीची परवानगी दिलेली नाही, आणि यापुढेही देणार नाही अशी माहिती गिरीष बापट यांनी दिली. त्याचबरोबर, ऑनलाईन औषध विक्री करणार्‍या कंपन्यांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे. तसंच ऑनलाईन औषध विक्री रोखण्यासाठी सायबर गुन्हे कायद्या अंतर्गत काही कारवाई करता येईल का?, याचाही तपासून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 50 ठिकाणी धाडी टाकून 10 कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध औषध विक्री करणार्‍यांना 2 वर्षांचा कारावास आणि दंड अशी तरतूद असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close