शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजी-माजी मुख्यमंत्री भिडले!

March 14, 2016 8:59 PM0 commentsViews:

मुंबई – 14 मार्च : शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज (सोमवारी) विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उत्तर देत असताना चांगलेच आक्रमक झाले. आघाडीच्या काळात 70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे आज शेतकर्‍यांची ही अवस्था झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली.

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या अशी मागणी विरोधकांनी केली. युतीचं सरकार शेतकर्‍याची फसवणूक करत असल्याचा आरोप विखेपाटलांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी सभात्याग केला. त्यावर मुख्यमंत्री चांगलेच भडकले, आणि आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा लेखा जोखाच त्यांनी विधानसभेत मांडला.

êËÖêêËÖêêËÖêËêy
राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना झालेल्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे आज राज्याची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्यात सिंचन नाही, शेतकर्‍यांना कर्ज मिळत नाही. आता घोटाळेबाज काय शेतकर्‍यांबद्दल बोलणार, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला. तसंच, विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचंही ते म्हणाले.

वर्धा बँक कोणी खाल्ली, बुलढाणा बँक कोणी खाल्ली, लातूर बँक कोणी खाल्ली, असं विचारत मुख्यमंत्र्यांनी तुम्ही बँकाच खाल्ल्या असा आरोप करत विरोधकांच्या टीकेतली हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सत्तेवर असताना उद्योगांसाठी 50 हजार कोटींची सूट दिली होती, असं सांगत फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी गेल्या वर्षात सरकारने 8 हजार कोटी रुपयांचे वाटप केलं आहे. आता 10 हजार कोटी रुपये वाटण्यात येतील असंही स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

त्याआधी युतीच्या काळात सर्वात जास्त आत्महत्या झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तर जयंत पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या मदतीचा हिशेब मागितला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close