रानडुक्करासाठी लावलेल्या सापळ्यात अडकला बिबट्या!

March 14, 2016 4:57 PM0 commentsViews:

 नांदेड – 14 मार्च : पाण्याच्या शोधत मानवी वसाहतीकडे आलेला बिबट्या रानडुक्करासाठी लावलेल्या सापळ्यात अडकला. नांदेड जिल्ह्यातील शीराढोण गावाजवळच्या देवीमाळा हा प्रकार घडला आहे.

sadfasdasday

अडकलेल्या बिबट्याची गर्जना ऐकून गावकरी माळावर गेले. रानडुक्करासाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्याचा पाय अडकल्याने तो सुटका करून घेण्यासाठी जोरजोरात गर्जना करत होता. बिबटया अडकल्याची माहिती गावकर्‍यांनी वन विभागाला दिली आणि त्यानंतर सुरू झाला थरार… वन विभाग आणि प्राणी मित्र गावात दाखल झाले.

बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयोग याआधी नांदेडमध्ये झाला नव्हता. पण प्राणीमित्र प्रसाद शिंदे यांनी धाडस दाखवत बिबटयाच्या जवळ जाऊन बिबट्यावर ईंजेक्शनचा मारा केला. शिंदेंनी केलेला पहिलाचं प्रयत्न यशस्वी ठरला आणि बिबट्या बेशुद्ध झाला. त्यानंतर वनविभाग आणि प्राणी मित्रांनी बिबट्याच्या पायातला फास काढला. फासात पाय अडकल्याने बिबट्याच्या पायाला ईजा झाली होती. पण ती दुखापत इतकी गंभीर नव्हती. शुद्धीवर येताच बिबट्या उठून पुन्हा जंगलात निघून गेला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close