नोटांच्या हाराची इन्कम टॅक्सकडून चौकशी

March 16, 2010 2:39 PM0 commentsViews: 4

15 मार्चउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांना देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटांच्या हाराची आता चौकशी सुरू झाली आहे. इन्कम टॅक्स विभाग या कोट्यवधींच्या उधळपट्टीची चौकशी करत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून आज लोकसभेत जोरदार आवाज उठवला. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. बहुजन समाज पक्षाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी लखनौमध्ये बसपाची महारॅली झाली. त्यावर 200 कोटींची उधळपट्टी सरकारी तिजोरीतून करण्यात आली. त्यात कार्यकर्त्यांनी मायावती यांना भलामोठा हार प्रदान केला. 1 हजार रुपयांच्या नोटांपासून बनवलेला हा हार 2 ते 5 कोटी रुपयांच्या किंमतीचा होता, असे समजते.

close