अजित पवार आणि सुनील तटकरेंनाही जेलमध्ये जावं लागणार- सोमैय्या

March 15, 2016 2:17 PM0 commentsViews:

 15 मार्च : छगन भुजबळांच्या अटकेनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे यांनाही जेलमध्ये जावं लागणार असा पुनरुच्चार किरीट सोमैया यांनी केला आहे. तसंच सिंचन घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना काल रात्री ईडीने अटक केली आहे. यावर किरीट सोमैय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Kirit somaiya
देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमैय्यांनी यांनी दिलेलं वचन आज पूर्ण केलं. हे आज पहिलं यश आहे. भक्कम पुरावं सादर केले असल्यानं भुजबळ आता पुढील 2 ते 4 वर्ष काही बाहेर येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली आहे.

आम्ही दिलेलं वचन पूर्ण केलं असून आता समीर भुजबळांसोबत छगन भुजबळांना ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे, असं सोमैय्या म्हणाले.

छगन भुजबळ ही तर सुरुवात आहे. यानंतर आता 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी सुनील तटकरे आणि अजित पवार यांनाही जेलमध्ये जावं लागणार आहे. एवढंच नव्हे आता एकापोठापाठ एक अटक सुरू होणार.र असा ठाम विश्वास सोमैय्या यांनी व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close