एटीएसवर कारवाई करण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची सूचना

March 16, 2010 2:55 PM0 commentsViews: 2

15 मार्चएटीएसने रविवारी मुंबईत पकडलेल्या दोन अतिरेक्यांची नावे जाहीर केल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एटीएसवर कारवाई करावी, अशा सूचनाही गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणची रेकी करणार्‍या या अतिरेक्यांना एटीएसने पकडले होते. मुंबईत घातपात घडवून पाकिस्तानात पळून जाण्याचा बेत या अतिरेक्यांनी आखला होता. त्यांचा सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे. अब्दुल लतिफ उर्फ गुड्डू आणि रेहान अली उर्फ सलीम अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. ओएनजीसी, कांदिवली येथील ठाकूर मॉल आणि मंगलदास मार्केट इथे घातपात करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती एटीएस प्रमुख के. पी. रघुवंशी यांनी दिली होती.

close