पुन्हा पैशांचे प्रदर्शन

March 17, 2010 9:28 AM0 commentsViews: 2

17 मार्चरॅलीमध्ये काही कोटींच्या नोटांचा हार स्वीकारल्याने मायावतींवर प्रचंड टीका झाली. पण या टीकेकडे दुर्लक्ष करत मायावतींनी आज पुन्हा तशाच प्रकारचा पैशांचा हार स्वीकारला. आणि या हाराची किं मत आहे, 18 लाख. एवढेच नाही तर मायावतींना यापुढे फक्त नोटांचेच हार घालणार अशी घोषणाही नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी केली आहे. सिद्दीकी हे मायावती मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. दरम्यान, आजच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी मायावतींवर टीकेचा भडीमार केला आहे. तर भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.अगोदरच्या हारावरून कालच लोकसभेत मोठा गदारोळ झाला होता. या हारातील पैशांची इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशीही सुरू झाली होती.

close