लँडिंग करताना विमानाचा टायर फुटला, प्रवाशी सुखरुप

March 16, 2016 10:03 AM0 commentsViews:

AIrIndia

मुंबई – 16 मार्च : मुंबई विमानतळावर लँडिंग करताना एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई विमानाचा टायर अचानक फुटल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. विमानात 160 प्रवासी होते, अशी माहिती मिळाली आहे.

मंगळवारी रात्री 10.45च्या सुमारास हा अपघात घडला. एआय- 630 क्रमांकाच्या विमानाला हा अपघात झाला. हे विमान विमानतळाच्या मुख्य रन-वेवर उतरताच त्याचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्यानंतर आग लागल्याने सगळेच प्रवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या अपघातानंतर हा रन-वे विमान उड्डाणासाठी बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेली नसून अपघाताची चौकशी संबंधित यंत्रणांनी सुरू केली आहे, असं सूत्रांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close