पेशावरमध्ये बसमध्ये स्फोट; 15 जणांचा मृत्यू

March 16, 2016 11:41 AM0 commentsViews:

pakistan blast

पेशावर-16 मार्च : पाकिस्तानातील पेशावरमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचार्‍यांना घेऊन जात असलेल्या बसमध्ये सद्दर भागात हा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात गोंधळ उडाला होता. जखमी कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये आगोदरच बॉम्ब ठेवण्यात आला होता. बॉम्बमध्ये आठ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.

बसमधील हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचेच बोलले जात असून, अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कर्मचार्‍यांना घेऊन ही बस मरदान इथून पेशावरकडे येत होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close