पाणीटंचाईमुळे यंदा कोरडी होळी खेळा- मुख्यमंत्री

March 16, 2016 1:30 PM0 commentsViews:

CM Deven

मुंबई – 15 मार्च : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता यंदा कोरडी होळी खेळण्याचं जाहीर आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्याचबरोबर, राज्यातील स्वीमिंग पूल जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत पोहण्याचा आनंद घेता येणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यासमोरील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील सर्व स्वीमिंग पूल जुलै महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. 23 तारखेला होळी आहे. तेव्हा पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, पुण्यात पाण्याचा अपव्यय करणार्‍या खेळ आणि रेन डान्सवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. याआधी ठाणे महानगर पालिकेनी स्वीमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच्या दोन दिवसानंतरच संपूर्ण राज्यभरात स्वीमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close