हॉटेलमध्ये ग्राहकांना अर्धा ग्लासच पाणी द्या, ठाणे पालिकेची सुचना

March 16, 2016 4:23 PM0 commentsViews:

ठाणे – 16 मार्च : हॉटेलमध्ये येणार्‍या खव्वयांना यापुढे केवळ अर्धा ग्लासच पाणी द्यावे अशी सुचना ठाणे महापालिकेने केल्या आहेत. त्यानुसार या संदर्भातील पत्रक काढण्यात आलंय. शहरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या हॉटेल्सना ही सूचना देण्यात आलीये.half_glass

त्याशिवाय यामध्ये पाणी जपून वापरा, आपला परिसर वारंवार पाण्याने धूव नका, विनाकारण गाडय़ा, अंगण धुवू नका, आवश्यक तेवढंच पाणी वापरा असे अनेक संदेश या माध्यमातून दिले गेलेत.

हॉटेलमध्ये बहुतेक वेळेला, फुल ग्लास पाणी दिल्यास ते संपूर्ण संपते असे नाही, परंतु त्यामुळे त्या ग्लासातील पाणी फेकले जाते. शहरात आजच्या घडीला दोन ते अडीच हजार हॉटेल असून एका हॉटेलमध्ये रोजचे 4 ग्राहक जरी पकडले तरी, अर्धा ग्लास पाणी जरी प्रत्येक ग्राहकाचा पकडला तरी रोज हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज पालिकेने वर्तविला आहे.

त्यामुळेच हॉटेलमधील पाण्याची बचत करण्यासाठी पालिकेने हा फंडा वापरण्याचे निश्चित केले आहे. शहरात आजच्या घडीला 4700 वाणिज्य ग्राहक असून यामध्ये दोन ते अडीच हजार हॉटेल वाल्यांचा समावेश असल्याचे पालिकेची आकडेवारी सांगते. त्यानुसार आता, या प्रत्येक हॉटेलला पत्रक बजावण्यात येऊन त्यातून पाणी बचतीचा संदेश दिला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close