अंबाबाईची झीज आता थांबणार, मूर्तीला मिळणार गारवा

March 16, 2016 4:28 PM0 commentsViews:

kolhapur mahalaxmi4कोल्हापूर – 16 मार्च : महालक्ष्मी मंदिरातील देवीची झीज आता थांबणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून मंदिर गाभार्‍यातील आद्रता नियंत्रणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळं यापुढं आता देवी गाभार्‍यामध्येच राहणारा…

गाभार्‍यातल्या आद्रतेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीनं आपला अहवाल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सादर केलाय. या अहवालात 45 सुचनांचा समावेश असून या समितीनं गाभार्‍यातील सर्वच गोष्टींचा बारकाईनं अभ्यास केलाय. फुलांचे हार, दिवे, मूर्तीची पूजा बांधताना केलेली सजावट, मंदिराच्या छतावरील सिरॅमिक टाईल्स अशा बाबींचा या समितीनं अभ्यास केलाय. त्यामुळे आता मंदिर आणि गाभार्‍याजवळचे नैसर्गिक स्त्रोतही खुले करण्यात येणार आहेत. त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज येणार्‍या हजारो भाविकांसह देवीच्या मूर्तीलाही गारवा मिळणार आहे. पण याबाबत देवस्थान समिती आणि श्रीपूजक यांच्यात एकमत होणार का याकडं आता अंबामातेच्या भाविकांचं लक्ष आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close