कंगना-ह्रतिकचा राडा, मुर्ख म्हणाली म्हणून हृतिकची नोटीस

March 16, 2016 5:17 PM0 commentsViews:

 kangana_hritik3
मुंबई -16 मार्च : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावतमध्ये सुरू असलेला वाद आता फारच चिघळलाय. या दोघांनी आधी एकमेकांना टोमणे मारण्यापासून सुरुवात केली. आता हे प्रकरण थेट कायेदेशीर नोटीस पाठवण्यापर्यंत पोचलंय.

कंगनाने हृतिकला ‘सीली एक्स म्हटलं होतं’ आणि त्यानंतर यांचं ट्विटर वॉर मोठा चर्चेचा विषय ठरला. हृतिकने आता थेट कंगनाला नोटीस पाठवलीये ज्यात बदनामी केल्याचा दावा हृतिकने कंगनावर केलाय. यानंतर कंगनाने देखील तिच्या वकिलामार्फत हृतिकला नोटीस पाठवलीये ज्यात तिने स्पष्ट केलंय की ‘मी माझ्या एक्स विषयी बोलताना कुठेही हृतिकच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे माझ्यावरचे हे आरोप चुकीचे आहेत असं देखील तिने या नोटिसमध्ये म्हंटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close