यंदा होळीत रेन डान्सवर बंदी

March 16, 2016 6:23 PM0 commentsViews:

rain_dance316 मार्च : राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. त्यामुळेच यंदाच्या होळीत पाण्याची नासडी टाळण्यासाठी रेन डान्सवर बंदी घालण्यात येणार आहे. तसे आदेश राज्य सरकार सर्व महापालिकांना देणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ झालाय यावेळी मुख्यमंत्र्यांनी, ‘होळी हा आपला महत्वाचा सण आहे. सर्वांनी तो आनंदाने साजरा करायचा आहे. परंतु, पाण्याची उधळपट्टी होता कामा नये. पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. कोरडी होळी खेळावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जुलैपर्यंत स्विमिंग पूल बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती दिली. तसं आवाहन करणारं पत्र राज्य सरकार महापालिकांना लिहिणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं. तसंच राज्यातील पाण्याची परिस्थिती पाहता होळीच्या निमित्तानं रेन डान्स, पाण्याचा अपव्यव टाळावा, यासाठी पाण्याचे टँकर देऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close