महानोर संमेलनाचे उदघाटक

March 17, 2010 10:18 AM0 commentsViews: 8

17 मार्च पुण्यात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन आता कवी ना. धों. महानोर करणार आहेत. या संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर करणार होते. पण विंदांचे निधन झाल्याने आता महानोर संमेलनाचे उदघाटन करतील असे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश देसाई यांनी जाहीर केले आहे. सर्वांना विचारात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे देसाई यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच महानोर यांनीही हा आपला सन्मान असल्याचे सांगत याबाबतची विनंती स्वीकारल्याचेही देसाई यांनी सांगितले. निसर्ग कवितांनी रसिकांवर गारुड घालणारे ना. धों. संमेलनाचे उदघाटक झाल्याचे समजताच रसिक आणि साहित्य जगतातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

close