पेट्रोल 3.07 पैसे तर डिझेल 1.90 पैशांनी महागलं

March 16, 2016 7:25 PM0 commentsViews:

petrol_34नवी दिल्ली – 16 मार्च : बजेटमध्ये सर्वसामान्य दिलासा दिल्यानंतर आता केंद्र सरकारने सर्वसामान्यांना झटका दिलाय. पेट्रोलच्या दरात 3.07 पैसे तर डिझेल 1 रुपया 90 पैशांनी महागलं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे.

आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत घसरणीमुळे मागील महिन्यात पेट्रोलच्या दरात 3.02 पैशांनी कपात कऱण्यात आली होती. डिझेलच्याही दरात 1.47 पैसे कपात करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीये. पेट्रोल 3.07 पैशांनी महागणार आहे. तर डिझेल 1 रुपया 90 पैशांनी महागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close