छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली

March 16, 2016 8:41 PM0 commentsViews:

Bhujbal PC16 मार्च : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी कोठडी असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली आहे. भुजबळ यांना तपासणीसाठी जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं पथक ईडी ऑफिसकडे रवाना झालंय.

छगन भुजबळ यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना दोन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आलीये. या प्रकरणातील इतर आरोपींसह समोरासमोर चौकशीसाठी भुजबळांनी कोठडी देण्यात आलीये. आज कोठडीत भुजबळांची तब्येत बिघडलीये. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या निर्णय ईडीच्या अधिकार्‍यांनी घेतलेला नाही. जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं पथक ईडी ऑफिसमध्ये पोहचणार आहे. तिथेच भुजबळांची तपासणी करून पुढचा निर्णय घेणार घेतला जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close