अण्णांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच

March 17, 2010 10:53 AM0 commentsViews: 1

17 मार्चज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारने पतसंस्था आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, धान्यापासून दारू निर्मितीचे धोरण ठरवावे आणि मंत्रालयातील केबिनच्या सजावटीचा खर्च त्या त्या मंत्र्याकडून वसूल करावा या अण्णांच्या मागण्या आहेत. या मागण्यावर निर्णय झाल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्याचा निर्धार अण्णांनी केला आहे.

close