बलात्कार पीडित तरुणीची आरोपींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

March 17, 2016 8:50 AM0 commentsViews:

Rape victimपुणे – 17 मार्च : बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीने आरोपींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू अजित गावडे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. आरोपी अजित गावडे अजून फरार आहे.

त्यातच , माजी आमदार पोपटराव गावडे आणि त्यांच्या साथीदारांकडून पीडित तरुणी आणि तीच्या पालकांना धमकावले जात आहे. पोपटराव गावडे यांच्या विरोधात देखील तक्रार देण्यात आली आहे. त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गावडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यावरही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. दरम्यान, आरोपींच्या नातेवाईकांकडून पीडित मुलीच्या कुटुंबाला धमक्या सुरुच होत्या. सततच्या जाचाला कंटाळून आणि पोलीस सहकार्य करत नसल्याने पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close