विजयादशमीपासून स्वंयसेवक फुल पॅन्टमध्ये !

March 17, 2016 12:30 PM0 commentsViews:

UNIFORM NOW AND DEN17 मार्च : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या गणवेशात झालेल्या बदलाची अंमलबजावणी विजयादशमीपासून होणार असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

संघाच्या बैठकीत माओवादाशी लढण्याच्या विषयावर आणि राज्यातील दुष्काळाच्या बाबतीतही चर्चा झाल्याचे संघाचे विदर्भ प्रांतप्रमुख दिपक तामशेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून संघाचा ड्रेस कोड हा पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट असा होता. पण, काळानुसार परिवर्तन झालं पाहिजे असं सांगत संघाने आता पांढरा शर्ट आणि राखाडी फुल पॅन्ट असा नवा ड्रेसकोड स्विकारला आहे. त्यामुळे येत्या विजयादशमीला स्वंयसेवक फुल पॅन्टमध्ये दिसणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close