नक्षलवाद्यांनी पळवलेल्या केमिकलचा शोध नाही

March 17, 2010 10:58 AM0 commentsViews: 3

17 मार्च गडचिरोलीच्या जंगलात 10 मार्चला नक्षलवाद्यांनी पळवलेल्या केमिकलचा अजूनही शोध लागलेला नाही. अमोनियम नायट्रेटने भरलेला टँकर चंद्रपूरहून मध्यप्रदेशातील दंतेवाडा येथे चालला होता. नक्षलवाद्यांनी 10 मार्चला हा टँकर पळवून 20 किमीवरील घनदाट जंगलात नेला. या टँकरमधील अमोनियम नायट्रेड 100 ते 125 नक्षलवाद्यांनी जंगलात उतरवून घेतले. आणि रिकामा टँकर चालकासह परत पाठवून दिला. या अमोनियम नायट्रेटचा वापर घातपातासाठी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गडचिरोलीच्या जंगलात या केमिकलचा शोध सुरू केला आहे. या शोधासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे

close