माचिस घेऊन जाणारा ट्रक पेटला, आग विझताच लोकांनी माचिसचे बॉक्स पळवले

March 17, 2016 2:19 PM0 commentsViews:

machis_truk_fire (1)शिर्डी -17 मार्च : अहमदनगर मनमाड महामार्गावर बाभळेश्वर चौकात माचिस वाहतूक करणार्‍या ट्रकने रात्री पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीविहानी झाली नाही. मात्र, आग विझल्यानंतर उरलेले काही माचिसचे बॉक्स बघ्यांनी पळवले.

रात्री नऊच्या सुमारास या ट्रकला आग लागली. माचिस वाहुन नेणार्‍या ट्रकला कंटेनर घासुन गेल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या आगीत ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. माचिस असल्याने आगीचे लोळच्या लोळ उठत होते. यामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.राहाता नगरपालिकेच्या बंबाने वेळीच पोहचत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिर्डी, लोणी येथील असे एकूण तीन ते चार बंबानी आग जलद विझवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, आग विझल्यानंतर मात्र माचिसचे बॉक्स बघ्यांनी पळवले. त्यामुळे एकीकडे दुर्घटना घडली असता मदत करणारे धावून येता आणि तेच हात माल पळवून घेऊन जात असं दृश्य या निमित्ताने पाहण्यास मिळालं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close