धोणीला दोन आठवडे विश्रांती

March 17, 2010 11:05 AM0 commentsViews: 1

17 मार्चचेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी दुखापतीमुळे दोन आठवडे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुध्दच्या मॅचमध्ये धोणीला ही दुखापत झाली होती. या मॅचमध्ये धोेणीची चेन्नई सुपर किंग्ज विजयी ठरली. कोलकाता नाईट रायडर्सचा त्यांनी 55 रन्सने पराभव केला. आणि त्याने केलेल्या 66 रन्सच्या जोरावर चेन्नईला 161 रन्सपर्यंत मजल मारता आली. धोणीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

close