रेल्वेच्या जाहिरातीही महाराष्ट्रातच द्या

March 17, 2010 11:46 AM0 commentsViews: 2

17 मार्चरेल्वेच्या परीक्षा मराठीतच घेणार म्हणताहेत तर त्याच्या जाहिरातीही महाराष्ट्रातच द्या, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' या पाक्षिकाचे प्रकाशन आज राज ठाकरे यांनी केले. शिरीष पारकर हे या पाक्षिकाचे संपादक आहेत. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला पुन्हा हात घातला. बेकायदेशीपणे मुंबईत राहणार्‍या परदेशी नागरिकांविरोधात मनसेची मोहीम सुरूच ठेवणार आहोत, असेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. तर रेल्वे भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य मिळाले पाहिजे आणि परीक्षेच्या जाहिराती मराठी पेपरमधून द्या, अशी मागणी करण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ लवकरच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

close