महाबजेटमधील संपूर्ण घोषणा एकाच पेजवर

March 18, 2016 4:08 PM0 commentsViews:
 • Mar 18, 2016

  16:01(IST)

  : न्यायालयांसाठी इमारती आणि न्यायाधिशांच्या निवासासाठी 200 कोटींच्या निधीची तरतूद - मुनगंटीवार

 • 16:01(IST)

  : औरंगाबाद पर्यटन जिल्हा घोषित - मुनगंटीवार

 • 16:00(IST)

  : पर्यटनासाठी नवे धोरण नुकतेच जाहीर 295 कोटींचा निधी - मुनगंटीवार

 • 16:00(IST)

  : सर्व शासकीय ग्रांथालयाचं ई ग्रंथालयात रुपांतर कऱणार यासाठी 17 कोटींची तरतूद - मुनगंटीवार

 • 15:58(IST)

  : पोलिसांनी घरे उपलब्ध करण्यासाठी 300 कोटींचा निधी - मुनगंटीवार

 • 15:58(IST)

  : सीसीटीव्ही प्रकल्पासाठी राज्यभरासाठी 300 कोटींचा निधी - मुनगंटीवार

 • 15:57(IST)

  : मांडवा येथे विकासासाठी 30 कोटींची तरतूद - मुनगंटीवार

 • 15:56(IST)

  : विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांसाठी 1000कोटी रुपयांची वीज सवलत

 • 15:56(IST)

  : सहा व्याघ्रप्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी 60 कोटींची निधीचा प्रस्ताव - मुनगंटीवार

 • 15:55(IST)

  :समुद्र जैवविविधता संवर्धनासाठी तिवर संवर्धता प्रतिष्ठान स्थापन कऱणार 115 कोटींचा निधी तरतूद - मुनगंटीवार

 • 15:55(IST)

  : चंद्रभागा अभियान राबवणार 20 कोटींच्या निधी - मुनगंटीवार

 • 15:54(IST)

  : प्लॅस्टिक कचर्‍यावरुन तयार केल्या जाणार्‍या इंधनाचा दर कमी

 • 15:53(IST)

  : एलईडी ट्यूबलाईट स्वस्त

 • 15:52(IST)

  : दिव्यांग व्यक्तींसाठी लागणार्‍या रेट्रोफिटला पूर्ण करमाफी

 • 15:52(IST)

  : हाँटेलमध्ये वापरात येणारे टेरी टाँवेल महागणार

LOAD MORE

MAHABUDGET

मुंबई – 18 मार्च : केंद्रीय अर्थबजेटच्या धर्तीवर शहरांकडून गावाकडे चला असा नारा देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. शेतकर्‍यांसाठी या बजेटमध्ये 25 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. वॅटमध्ये अर्धा टक्का वाढ करून सर्वसामन्य जनतेला धक्का दिलाय. यामुळे सर्वच वस्तू महागणार आहे. नेमक्या कोणकोणत्या घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याचा हा LIVE ब्लॉग…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close