स्फोटाचा तपास सीबीआयकडे द्या

March 17, 2010 12:07 PM0 commentsViews:

17 मार्चपुण्यातील बॉम्बस्फोटाच्या चौकशीत पोलिसांना आणि गृहमंत्रालयाला अजून कोणतेही यश आलेले नाही. ही महाराष्ट्र पोलिसांची निष्क्रियता असून या स्फोटाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. मुंडे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना पोलीस योग्य वागणूक देत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी बागवेंसारख्या मोठ्या माणसावर मी प्रतिक्रिया देणार नाही, अशी उपहासात्मक टीका केली.

close